बारामती(वार्ताहर): येथील रागिणी फाऊंडेशनच्या वतीने श्रावणमास आणि नागपंचमी निमित्त उखाणा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्पर्धकांनी ’माणुसकीचा वसा’ या विषयावर आधारित उखाणा सादर करायचा होता. ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आली होती.
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :- प्रथम – सौ.नितु शिवाजी साळुंखे(बारामती), द्वितीय-सौ.अर्चना आनंद थोरात, तृतीय- तृतीय क्रमांक (हडपसर, पुणे) व सौ.वृषाली वैभव निंबाळकर (बारामती), उत्तेजनार्थ- सौ.प्राची प्रमोद चिंचकर (कालठण,इंदापूर), विशेष आकर्षण- सौ.पल्लवी मनीष जोशी (बारामती)
या उखाणा स्पर्धेचे परीक्षण सौ.मृदुल देशपांडे व सौ.अलका रसाळ यांनी केले. ’महिलांना आपल्या उखाण्याचा माध्यमातून सामाजिक संदेश देता यावा, पारंपारिक ते बरोबरच आधुनिक विचारांचा वारसा जपता यावा, प्रबोधनपर विचारांची देवाण-घेवाण समाजामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून व्हावी, या उद्देशाने उखाणा स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा राजश्री आगम यांनी सांगितले.
तसेच यावेळी उपस्थित महिलांना आरोग्याच्या दृष्टीने सेंद्रिय अन्नपदार्थांचे महत्त्व याबद्दल बारामती ऑरगॅनिकसचे संचालक श्री सतीश काटे यांनी सांगितले. तसेच महिलांनी ’ आपल्या कलागुणांना वाव द्यावा, कुटुंबातील जबाबदारी सोबत स्वतःच्या छंदाला वेळ दिला पाहिजे’ असे मत अल्पा भंडारी यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी सहभागी स्पर्धक वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितीन भंडारी, ऋतुजा आगम, सुजाता लोंढे, सीमा हिरवे, पूजा बोराटे, मंगल बोरावके, शिवानी घोडके व रागिणी फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांचे योगदान लाभले. यावेळी राजश्री आगम यांनी सर्वांचे आभार मानले.