तिबेट आणि भारत यांच्यातील जमीन म्हणजे ङ्कस्पिती व्हॅलीङ्ख यास ङ्कमधली जमीनङ्ख म्हणूनही संबोधले जाते. या व्हॅलीवर बौद्ध धर्माचा प्रचंड प्रभाव असल्याने सर्व गावे शांत व संयमाची आहेत. याठिकाणी कोरडे हवामान असते. वाळवंट थंड असते, आकर्षक दर्या, वारे असे वाहते की, जसं जमीन सपाटीकरण केले आहे. अशा अविस्मरणीय ठिकाणी जाण्याचा प्रथम योग बारामतीच्या साहस ऍडव्हेंचर्सचे प्रमुख सचिन आगवणे व सागर हिंगमिरे यांना आला. स्पिती व्हॅली बुलेट राईड नियोजित करून ती वेळेत पूर्ण करण्याचा व बारामतीच्या नावाला साजेल असा विक्रम यांनी केला आहे. या दोघांना साहस ऍडव्हेंचर्सचे अजित जंगम यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

सचिन आगवणे व सागर हिंगमिरे यांनी 30 जुलै 2021 रोजी बारामती ते चंदिगड 1800 कि.मी.चा 36 तासाचा प्रवास चार चाकी वाहनात केला. दीड दिवस प्रवास करीत चंदीगडला पोहचल्यावर 1 ऑगस्टला चंदीगड ते स्पिटी व्हॅली दहा दिवसाचा बुलेट राईड सुरू करून दि.10 ऑगस्टला पुन्हा चंदीगडला परत आले. त्यानंतर चंदीगड ते बारामती पुन्हा चार चाकी वाहनात परतीचा प्रवास करीत दीड दिवसाने बारामतीच्या भूमित आगमन केले.

काही लेखक व कादंबरीकार यांनी एक जगातील जग, देवतांचे वास्तव्य असलेले ठिकाण असे केले आहे. हिमाचल प्रदेशातील उत्तर-पूर्व भागात हिमालयात स्पिती व्हॅली आहे. खुप कमी लोक वस्ती असलेला प्रदेश असून खुप कमी ऑक्सिजन या ठिकाणी असते. जगातील सर्वात उंचीवरचे गाव, पोस्ट ऑफिस व सर्वात उंचावरचा पेट्रोल पंप येथेच आहे. साधारण पंधराशे किलोमिटरचा कच्चा रोडचा प्रवास नदी नाले ओलांडत या साहस विरानी बुलेटवर पूर्ण केला. या वीरांचा आनंद गगनभरारी घेत होता.

या व्हॅलीत निसर्गरम्य हिमालयी तलाव, हजारो वर्षापुर्वीचे जुन्या मठांमध्ये आजही प्रार्थना सुरू असते. स्पिती नदी, हिमनदीचा प्रवाह, आश्र्चर्य करणारे निसर्गचित्रे व अध्यात्माच्या अकस्मात भूमीचा अनुभव पाहुण डोळ्याचे पारणे फिटल्यासारखे होते. याठिकाणचे स्थानिक नागरीक लाहौल आणि स्पिती भाषेत बोलतात व पर्यटनाबरोबर येथील व्यापारी हिंदी आणि इंग्रजीमध्ये संवाद साधतात.
अंगावर थंडी झेलत चंद्रताललेक 3 कि.मी. उंच गगनचुंबी घेणारा डोंगर चालत सर केला. ऑक्सिजन कमी असल्याने धाप लागत होती मात्र, आगवणे व हिंगमिरे यांचे ध्येय, धाडस, आत्मविश्र्वास घेऊन कौशल्य दाखवीत हा डोंगर सर केला.
या स्पिती व्हॅली बुलेट राईडला मुंबई, पुणे व बारामती येथुन 21 जणांनी सहभाग घेतला होता. बारामतीचे सचिन आगवणे व सागर हिंगमिरे यांनी बोलताना सांगितले की, सर्वजण लेह-लदाग प्रवास करतात मात्र स्पिटी व्हॅलीचा वाहनावर प्रवास करून निसर्गाचा एक वेगळा आनंद घ्यावा.
या दोघा ध्येयवेड्यांनी स्पिटी व्हॅली पूर्ण केल्याने बारामतीकरांनी कौतुक करून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.