शिक्षक सोसायटीच्या उद्यान कामाचा शुभारंभ

बारामती(वार्ताहर): माजी उपनगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक नवनाथ बल्लाळ यांनी सततच्या केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रभाग क्र.19 मधील फलटण रोड येथील शिक्षक सोसायटीतील उद्यानाच्या कामाचा शुभारंभ नगरपरिषदेच्या अध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

या उद्यानाच्या कामासाठी गटनेते सचिन सातव यांनी विशेष सहकार्य केले अनेक वर्षापासून तेथील रहिवाशांची शिक्षक सोसायटी येथे उद्यान विकसित करावे अशी मागणी होती. उद्यानाच्या कामासाठी नगरसेविका सौ.तरन्नुम सय्यद, सौ.अनिता जगताप यांनी सहकार्य केले.

या उद्यान कामाच्या शुभारंभ प्रसंगी सचिन सातव, सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती सत्यव्रत काळे, मुस्लीम बँकेचे संचालक आलताफ सय्यद, राष्ट्रवादी कॉंग्रेस बारामती शहर उपाध्यक्ष निलेश मोरे, बबलू जगताप, राजाभाऊ शेख, भारत वाघमारे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे बारामती शहर सचिव सोमनाथ आटोळे, गौतम लोंढे, कॉन्ट्रॅक्टर विशाल गायकवाड सुजित कदम तसेच परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

गटनेते सचिन सातव व स्थानिक नगरसेवक नवनाथ बल्लाळ यांनी उद्यानाचे काम मार्गी लावल्याबद्दल शिक्षक सोसायटीतील रहिवाश्यांनी त्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!