बारामती(वार्ताहर): येथील मोरगांव रोड टोलनाक्याजवळ असणार्या एकता इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये सहारा फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन, आरोग्य विभाग व बारामती नगरपरिषदेच्या सौजन्याने कोविड लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. बारामती शहरातील नागरीकांकरीता कोरोना प्रतिबंधक लस याठिकाणी सकाळी 10 ते दु.3 वाजेपर्यंत दिली जाते. तरी जास्तीत जास्त नागरीकांनी याचा फायदा घ्यावा असे सहारा फाऊंडेशनचे अध्यक्ष परवेज सय्यद (मो.9422327786) यांनी कळविले आहे.