बारामती(वार्ताहर): पुणे शरीर सौष्ठव संघटनेच्या बारामती ुतालुका अध्यक्षपदी संतोष जगताप यांची एकमताने निवड करण्यात आली.
महाराणा प्रताप संघ, नेहरू स्टेडियम, पुणे याठिकाणी बुधवार दि.1 सप्टेंबर 2021 रोजी शरीर सौष्ठव संघटनेची बैठक पार पडली यामध्ये संतोष जगताप यांची निवड करण्यात आली.
यावेळी पुणे शरीर सौष्ठव संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरदअण्णा चव्हाण, पिंपरी चिंचवड येथील संघटनेचे अध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, पुणे कटोमेंटचे उपाध्यक्ष बापू गानला, महाराष्ट्र जीवनगौरव पुरस्कार विजेते अरूण दातार, छत्रपती पुरस्कार विजेते अनिल शिंदे, मंदार चवरकर, संघटक शरद मारणे, राष्ट्रीय पंच अब्राहम विल्यम्स, कमलाकर वीरकर, आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संतोष जगताप यांनी खूप हालाखीच्या परिस्थिती संघर्ष करीत राज्यात विविध ठिकाणी शरीर सौष्ठव स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसे पटकावून बारामतीच्या नावलौकीकात भर टाकली आहे. सध्या ते अखिल तांदुळवाडी वेस तरूण मंडळ संचलित असणारी व्यायामशाळेत तन-मनाने युवकांना मार्गदर्शन प्रशिक्षण देत आहेत. निवड झालेनंतर त्यांनी बोलताना सांगितले की, इमानदारी आणि मेहनत कधीच वाया जात नाही.त्याचे फळ उशिरा का होईना पण जरूर भेटते.