बारामती(वार्ताहर): पर्यावरण संवर्धनासाठी विविध रोपांची लागवड करून राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालयात शिक्षक दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
याप्रसंगी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित सर्व शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी विद्यालयाचे प्रा.झाकीर शेख यांनी राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात शिक्षकांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन केले व शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत अशाच पद्धतीने काम करणार असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक कल्याण देवडे, पर्यवेक्षक श्री जाधव, रयत बँकेचे संचालक अर्जुन मलगुंडे, जेष्ठ शिक्षक श्री.गुळवे,श्री.पळसे, श्री मांडके,श्री मिंड उपस्थित होते.