शहर पोलीस स्टेशनला महारक्तदान शिबीराचे आयोजन

बारामती(वार्ताहर): देशात व राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवू लागला आहे. तसेच आरोग्य यंत्रणेकडून रक्तदानासाठी आव्हान करण्यात येत आहे. या रक्तसंकटात पोलिसांनी आपली सामाजिक बांधिलकी दाखवून बुधवार दि.15 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 9 ते सायं.5:30 यावेळेत बारामती शहर पोलीस स्टेशन याठिकाणी महारक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.

पुणे जिल्हाचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली गणेश मंडळाच्या मदतीने या शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सांगितले आहे.

बारामती शहर व तालुक्यातील नागरिकांनी या महारक्तदान शिबिरात सहभागी होऊन स्व:इच्छेने रक्तदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून नागरिकांना शिस्त लावण्याचे काम करणार्‍या पोलिसांनीच स्वयंसेवी संस्थेप्रमाणे मदतीचा हात पुढे केला आहे. नागरीकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान श्रेष्ठदान करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!