बारामती(वार्ताहर): येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष प्रा. माधव जोशी यांना नवी दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.मनीपुर राज्याचे नियोजन मंत्री लोरेनबम रामेश्वर मित्तई, डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन दिल्लीचे महामंत्री दवलतराम, राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे संसदीय राष्ट्रीय महासचिव ग्यानचंद गौतम इ. मान्यवरांच्या हस्ते श्री.जोशी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
देशाचे माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांच्या 35 व्या पुण्यतिथी स्मृतीदिनाचे निमित्ताने देशभरातील 35 राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
दि.8 मे 2021 रोजी नेपाळ भारत मधेशी दलित मैत्री संघ व बाबू जगजीवन राम कला संस्कृती आणि साहित्य अकादमीच्या वतीने दुसर्या दलित आंतरराष्ट्रीय परिषद या दोन्ही संघटनेचे अध्यक्ष डॉ.नफेसिंह खोबा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. परंतु कोरोना महामारीच्या कालावधीत हा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन लुंम्बिनी नेपाळ येथे करण्यात आले होते.
यावेळी महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे संचालक प्रथमेश विकास आबनावे यांना महाराष्ट्र बाबू जगजीवन राम कला संस्कृती आणि साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ.खोबा यांचेहस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी डॉ. खोबा म्हणाले की, दरवर्षी अकादमीचे वतीने बाबू जगजीवन राम याची पुण्यतिथी स्मृतीदिनानिमित्त व समर्पण दिनाच्या निमित्ताने अकादमीचे वतीने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतात. बाबुजींची आठवण म्हणून देशाच्या दलित उत्थानाचे कार्याचा आढावा घेवून हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यावेळी बाबू जगजीवन राम याची मुलगी, व देशाच्या 14 व्या लोकसभेच्या माजी सभापती मा मिराकुमार यांच्या आशीर्वाद पत्राचे,शुभेच्छा संदेशाचे वाचन राज्य सचिव प्रा.गोरख साठे (बारामती) यांनी केले.