बारामती(वार्ताहर): ज्या प्रमाणे बारामतीचा विकास झाला त्या पटीत मात्र, शासकीय कार्यालयात पैसे घेण्याचे प्रकार मात्र काही थांबले नाही उलट संबंधित अधिकार्याचा त्या पटीत विकास होताना दिसत आहे.
बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दि.6 सप्टेंबर 2021 रोजी ऑनलाईन सर्व कागदपत्र जमा केल्यानंतर वाहन चालविण्याचा पक्का परवाना काढण्याची तारीख देण्यात आली होती. कोणत्याही एजंटचे सहकार्य न घेता परवाना काढण्याची प्रक्रिया केली. मात्र, एका एजंटने मी पत्रकार आहे हे माहीत असताना त्यावर शिक्का मारला, असो…वाटले ओळखीचा आहे म्हणून शिक्का मारला असेल.
दुचाकी पक्का परवाना काढण्याची चाचणी दिल्यानंतर संबंधित मोटार वाहन निरीक्षकाने तुमच्या एजंटकडे कागद द्या असे सांगितले. ज्या एजंटने आम्हाला माहिती दिली मदत केली त्याकडे गेलो त्याने सांगितले 150 रूपये द्या साहेबांचे असे म्हटल्यावर समाजात जनजागृती करणार्या पत्रकारांची ही अवस्था असेल तर सर्वसामान्य नागरीकांची काय? त्या एजंटला सांगितले तू माहिती दिली, मदत केली त्याबाबत तुला स्वखुषीने 150 नाही 200 रूपये देतो पण संबंधित मोटार वाहन निरीक्षकांस देण्याचे काय कारण तरी सुद्धा त्याने 150 रूपये नाहीतर मला द्यावे लागतील असे म्हणाला.
दररोज 100 च्या वर वाहन चालविण्याची चाचणी देणारे किंवा विविध कामे करून घेण्यासाठी ग्राहक या कार्यालयात येत असतात प्रत्येकाकडून 150 रूपये म्हटले तर दिवसाचे त्या संबंधित अधिकार्याला शासनाच्या पगारा व्यतिरीक्त पैसा मिळतो किती? हा सर्वसामान्य नागरीकांना पडलेला प्रश्र्न असेल. नागरीकांमध्ये जागृती होण्यासाठी याबाबत परिवहन आयुक्त यांच्याकडे तक्रार करणार आहे.