12% लाभांश जाहीर!
बारामती(वार्ताहर): सर्वाधिक महाराष्ट्रातील ज्या नगरपरिषद पातळीवर पतसंस्था आहेत त्यामध्ये बारामती कामगार पतसंस्था ज्यास्त कर्ज देणारी व कमी व्याजदर घेणारी बारामती नगरपरिषद कामगार पतसंस्था अव्वल ठरणार असल्याचे संस्थेचे चेअरमन राजेंद्र सोनवणे यांनी यावेळी सांगितले. यावर्षी सभासदांना 12% लाभांश वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जाहिर करण्यात आला.
बारामती नगरपरिषद कामगार सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक 5 सप्टेंबर 2021 रोजी संपन्न झाली. यावेळी मोबाईल व्हीडीओ कॉन्फरन्स या ऑनलाईन सभेकरिता संस्थेचे बहुतांश सभासदांनी आपला सहभाग नोंदवून सभा खेळीमेळीच्या वातावरणात पारपाडण्यासाठी सभासदांनी सहकार्य केले.
संचालक मंडळाने संस्थेचा कारभार काटकसरीने करत सलग 12 वर्ष 12% व्याजदराने लाभांश देण्याचा एक विक्रम केला आहे. 12% प्रमाणे सभासदांच्या बँक खात्यामध्ये तात्काळ लाभांश जमा करण्यात आला आहे. 12 वर्षापासुन संस्थेस ऑडीट वर्ग अ मिळालेला असून पतसंस्थेच्या सभासदांना 5 लाखावरून साडे सात लाख कर्ज मर्यादेमध्ये वाढ करण्यात आली तसेच व्याजाचा दर 12% वरून 9% इतका करण्याचा असा ठराव सभासदांनी सर्वानुमते मंजुर केला असल्याचे संस्थेचे सचिव सुनिल धुमाळ यांनी सांगितले आहे.
राजेंद्र सोनवणे म्हणाले की, संस्थेचे सर्वसमावेशकता, काटकसर, पारदर्शकतेच्या जोरावर व सभासदांच्या पाठींब्याने स्वभांडवल व स्वबळावर गेल्या 8 वर्षापासून संस्थेने यशस्वी अशी वाटचाल केली आहे. बारामती नगरपरिषदेच्या कामगार पतसंस्थेवर सहकारी बँक अथवा इतर कोणत्याही बँकेचे कोणतेही कर्ज नाही. संस्थेचे भाग भांडवल 2 कोटी 53 लाख असून बँकेत 1 कोटी 48 लाख रूपये बचत खात्यामध्ये शिल्लक आहेत. संस्थेच्या सभासदांना अत्तापर्यंत संस्थेने 3 कोटी 57 लाख इतके कर्ज वाटप केलेले आहे. यंदाच्या वर्षी संस्थेला 42 लाख 9 हजार 363 रूपये इतका नफा झाला असून दरवर्षी सभासदांना गृहपयोगी वस्तु भेट म्हणून देण्यात येतात. या वर्षी सभासदांना 35 स्टील भांड्यांचा सेट भेट स्वरूपात देण्यात येणार आहे. सभासदांचे त्यांच्या एपतीप्रमाणे रिकरींगची सुविधा चालू केलेली असल्याने त्याची रक्कम दिवाळी सणाकरीता देण्यात येते. तसेच सभासदांच्या घरातील आई, वडील, पती, पत्नी मुलगा, मुलगी आजारपणामुळे किंवा इतर कारणामुळे मयत झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना रक्कम रुपये 10 हजार संस्थेच्या कामगार कल्याण निधीतून सहानूभुती म्हणून आर्थिक मदत संस्थेच्या वतीने दिली जाते.
संस्थेचे प्रास्ताविक व सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे चेअरमन राजेंद्र सोनवणे यांनी दिली. तसेच विषय पत्रिका वाचन संस्थेचे सचिव सुनिल धुमाळ यांनी केले.
या प्रसंगी व्हाईस चेअरमन राजु सुपेकर तसेच माजी चेअरमन व विद्यमान संचालक देविदास साळुंके, अतुल बनकर, भालचंद्र ढमे, अनिल शिंदे, राजेंद्र शिंदे, निलेश आहिवळे, अरूण थोरात, हनुमंत गायकवाड, संजय गडियल, श्रीमती प्रतिभा सोनवणे, श्रीमती सखु श्याम खरात, लिपीक अनिल गोंजारी उपस्थित होते. आभार देविदास साळुंके यांनी मानले.