बारामती(वार्ताहर): भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा कामगार आघाडीच्या उपाध्यक्षपदी संजय दराडे यांची नियुक्ती करण्यात आली.
पुणे जिल्हा कामगार आघाडीचे अध्यक्ष जयश शिंदे यांच्या आदेश व शिफारशीने नुकतेच पत्र देवून नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती नंतर बोलताना संजय दराडे म्हणाले की, भविष्यात कामगारांच्या विविध समस्या व कल्याणासाठी झटणार आहे. पक्षाच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्र्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. पक्षाने दिलेल्या संधीतून मनापासून काम करणार आहे.
श्री.दराडे यांनी जयश शिंदे, अनु.जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे चिटणीस यशपाल भोसले यांचे आभार मानले. यावेळी अक्षय गायकवाड, शरद भगत, शामराव जगताप, ओंकार दराडे इ. मान्यवर उपस्थित होते.