वतन की लकीर (ऑनलाईन): तिसर्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असताना संपूर्ण भारतात कोरोनाचे संकट वाढताना दिसत आहे. कालच्या तुलनेत आज 12 टक्क्याने अधिक रूग्णसंख्या वाढलेली समोर आलेली आहे. अहमदनगर जिल्ह्यात अजुनही चिंता कायम आहे. संगमनेर आणि पारनेर या तालुक्यातील रूग्णसंख्या सुरूवातीपासूनच जास्त आहे.
बारामतीत दि.01 सप्टेंबर 2021 रोजी दिवसभरात बारामती शहरातून 32 तर ग्रामीण भागातून 45 रुग्ण असे मिळून 77 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
काल बारामतीत 497 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 30 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकही रुग्ण प्रतिक्षेत नाही. इतर तालुक्यात 08 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
काल खाजगी प्रयोगशाळेत 71 रूग्णांची आरटी-पीसीआर तपासणी केली असता 11 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 1457 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 36 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला आहे. म्युकर मायकॉसिसचे एकुण 40 रूग्णांपैकी बारामती तालुक्यातील 31 तर इतर तालुक्यातील 09 रूग्ण आहेत. यापैकी उपचार घेणारे 04 रूग्ण आहेत.
काल दिवसभरात बारामतीत एकूण 77 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बारामतीत 28 हजार 797 रुग्ण असून, बरे झालेले 27 हजार 730 आहे. आज डिस्चार्ज 40 असुन, आतापर्यंत मृत्यू झालेले 719 असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी कळविले आहे.
संपूर्ण जगभरात 21 कोटी 85 लाख 02 हजार 500 एकुण रूग्ण असुन मृतांची संख्या 45 लाख 44 हजार 546 आहे. प्रति एक दशलक्ष लोकांमागील रूग्ण संख्या 28 हजार 100 आहे.
भारतात 3 कोटी 28 लाख 57 हजार 937 एकुण रूग्ण असुन मृतांची संख्या 4 लाख 39 हजार 529 आहे. प्रति एक दशलक्ष लोकांमागील रूग्ण संख्या 24 हजार 151 आहे. एका दिवसात भारतात 47 हजार 092 रूग्ण सापडतात.
तर महाराष्ट्रात एकुण रूग्ण 64 लाख 69 हजार 332 असुन मृतांची संख्या 1 लाख 37 हजार 496 आहे. प्रति एक दशलक्ष लोकांमागील रूग्ण संख्या 56 हजार 657 आहे. एका दिवसात महाराष्ट्रात 4 हजार 456 रूग्ण सापडतात.