बारामती(वार्ताहर): काहींना राजकीय पक्षाच्या नेत्यावर एवढे प्रेम असते की, आपल्याकडून गुन्हा तर घडत नाही ना, कोणत्या समाजाच्या भावना दुखावल्या जात तर नाही ना, याचे भान सुद्धा राहत नाही असाच प्रकार सोशल मिडीयावर घडल्याने भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश राजू वाघेला यांनी ऍट्रॉसिटी ऍक्टनुसार संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी बारामती शहर पोलीस स्टेशनला केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, विधानपरिषद सदस्य व भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गोपिचंद पडळकर यांनी स्वत:च्या फेसबुक पेजवर व्हिडिओच्या माध्यमातून 26 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वा 58 मि.दै.सामनामध्ये लिहिलेल्या अग्रलेखावरून संजय राऊतांवर आगपखाड केली. त्या व्हिडिओवर हजारो कमेंट व 536 लोकांना सदरचा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे.
या व्हिडिओच्या खाली जामखेडचे प्रकाश टेकाळे या इसमाने “संडास बाधरूमचा मालक आणि रूबाब भंग्याचा… गोपीचंद तुला तुझी आणखीन लायकी नाही कळली वाटत.. तुला राणे सारखे ऊचल्या शिवाय पर्याय नाही आता…थांब थोड तुझा पण एक दिवस नार्या 100% होनार” अशी कमेंट टाकली आहे.
या कमेंटमुळे संपूर्ण वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्याने मुकेश वाघेला यांनी दि.30 ऑगस्ट 2021 रोजी लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली आहे. अशा लोकांमुळे महाराष्ट्रातील सामाजिक शांतता व सुव्यवस्था गढूळ होत असल्याचेही त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
या फिर्यादीत शिवसेना युवा सेनेचे तालुका प्रमुख निखिल देवकाते यांचे सुद्धा नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. सदरचा व्हिडिओ निखिल देवकाते यांना टॅग करण्यात आलेला होता त्यामुळे या व्हिडिओवर प्रथम कमेंट निखिल देवकाते यांनी केलेली होती, त्यानंतर इतरांनी केली आहे.
सदर इसमास त्वरीत जेरबंद करून समाजाच्या भावनांचा उद्रेक होण्यापासून टाळावा अन्यथा सदर इसमांवर कारवाई व्हावी म्हणून समाजाला रस्त्यावर येऊन सनदशीर मार्गाने न्यायीक लढाई लढावी लागेल असेही दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
कशी होते यात ऍट्रॉसिटीनुसार कारवाई….
महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभागाने दि.9 नोव्हेंबर 2000 रोजी ङ्गभंगीङ्घ ऐवजी ङ्गरूखीङ्घ किंवा “वाल्मिकी” या तत्सम जातीचा उल्लेख करण्याबाबत परिपत्रकानुसार जाहिर केले आहे. “भंगी” हा शब्दाने घृणास्पद व अपमानाजनक बहिष्कृत अशा अर्थाने व्यवहारात प्रचलित झालेला जातीदर्शक शब्द असून त्याचा शासन व्यवहारातील उपयोग हा या समाजाची अवहेलना करणारा ठरतो. असे म्हटले आहे.
या व्हिडिओच्या खाली माझी काही जातीवाचक कमेंट असेल किंवा मी कोणी दिलेल्या जातीवाचक कमेंटवर लाईक केले असेल तर माझ्यावर कारवाई झालीच पाहिजे -निखिल देवकाते, प्रमुख, युवा सेना बारामती तालुका