अशोक घोडके यांच्याकडून..
जंक्शन(वार्ताहर): जागतिक कोरोना महामारीत या अदृश्य शत्रूशी दोन हाथ करून लढा देणार्या डॉक्टराचा व जिवाची पर्वा न करता प्रत्यक्षात घटनास्थळी जावून बातमी संकलन करून प्रकाशित करणार्या पत्रकारांचा सत्कार मराठी पत्रकार परिषद संलग्न इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला.
या कार्यक्रमाला राज्यमंत्री ना.दत्तात्रय भरणे, माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, जि.प.माजी सभापती प्रवीण माने, माजी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, नेचर डेअरीचे अध्यक्ष अर्जुन देसाई, साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, नीरा-भिमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, छत्रपतीचे उपाध्यक्ष अमोल पाटील, माजी अध्यक्ष कांतीलाल जामदार, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, मोहन दुधाळ, मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, ऍड.भगवानराव खारतुडे, सोशल मिडीया निमंत्रक बापूसाहेब गोरे, पुणे जिल्हाध्यक्ष सुनिल लोणकर, सोशल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष जनार्धन दांडगे, जिल्हा समन्वयक सुनिल जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम सोहळा पार पडला.
यावेळी कोरोनाच्या काळामध्ये रुग्णसेवा देणार्या डॉ.प्रशांत महाजन, डॉ.मच्छिंद्र हेगडे, डॉ.नागनाथ जगताप,लॅब टेक्निशन रेश्मा कुदळे-बोराटे, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक बिराप्पा लातुरे, उपपोलिस निरीक्षक अतुल खंदारे,नितीन लकडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
तसेच तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार अतुल तेरखेडकर, डॉ.विकास शहा, प्रशांत ननवरे, महेश स्वामी, शैलेश काटे, दादासाहेब थोरात, सुरेश मिसाळ, नारायण मोरे, अमोल तोरणे, रियाज सय्यद, प्रशांत चवरे, मनोहर चांदणे, जावेद मुलाणी, राहुल ढवळे, नितीन चितळकर, काशिनाथ सोलनकर, तात्यासाहेब घाटे, हरीदास वाघमोडे, सचिन लोंढे, विनायक चांदगुडे, बाळासाहेब तांबे, आदम पठाण, शौकत तांबोळी, प्रदिप तरंगे, गजानन टिंगरे, सुरेश निडबने,प्रेमकुमार धर्माधिकारी, रामदास पवार, बाळासाहेब धवडे, अर्जुन भोंग, तुषार क्षीरसागर, पोपट मुळीक, सागर जगदाळे, गोकुळ टंकसाळे, प्रवीण नगरे, सुधाकर बोराटे, बाळासाहेब रणवरे, अशोक घोडके, जितेंद्र जाधव, सिद्धार्थ मखरे, उदयसिंह देशमुख, अमोल रजपूत, बाळासाहेब सुतार, इम्तिहाज मुलाणी, शहाजीराजे भोसले,मनोज साबळे, रोहित वाघमोडे, निलेश भोंग, प्रसाद तेरखडकर, धनाजी थोरात यांचा सत्कार करण्यात आला.
इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजकुमार थोरात यांनी स्वागत केले तर समन्वयक धनंजय थोरात यांनी प्रास्ताविक व जिल्हा सरचिटणीस सतिश सांगळे यांनी आभार मानले.