अशोक घोडके यांच्याकडून…
गोतंडी(वार्ताहर): येथील उपकेंद्रात बजाज कोविड-19 लसीकरण झाले. यामध्ये 500 लोकांना लसीकरण केले. यावेळी गट विकास अधिकारी विजयकुमार परीट व तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत महाजन यांनी भेट देऊन पाहणी केली व आवश्यक मार्गदर्शन केले. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.ऐश्वर्या महामुनी, आरोग्य सेवक समाधान शेटे, आरोग्य सेविका संगीता चितारे, डाटा ऑपरेटर श्रीकृष्ण इवरे व सर्व आशा अंगणवाडी सेविका, त्यासोबत गावचे सरपंच गुरुनाथ नलवडे, उपसरपंच परशुराम जाधव, ग्रामसेवक लोणकर भाऊसाहेब, व माजी चेअरमन आप्पा पाटील, व ग्रामपंचायत सदस्य छगन शेंडे, आबा मारकड, दत्तू बिबे, हरिभाऊ खाडे पाटील, रवी कांबळे, अनिल खराडे इ.उपस्थित होते.