बारामती(वार्ताहर): श्री संत वीरशैव कक्कय्या (ढोर) समाज विकास मंडळाच्या बारामती तालुका अध्यक्षपदी सोमनाथ दिगंबर गजाकस यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नुकतीच श्री संत वीरशैव कक्कय्या (ढोर) समाज विकास मंडळाची सर्वसाधारण सभा जवाहरनगर हौसिंग सोसायटी बारामती येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
या सभेला स्थानिक नगरसेविका सौ.निता चव्हाण, माजी नगरसेवक अभिजीत चव्हाण व समाजाचे ज्येष्ठ नेते अशोकराव शिंदे, गणेश व्हटकर इ.मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सन 2021 ते 2026 या पंचवार्षिक कालावधीसाठी कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष सोमनाथ दिगंबर गजाकस, कार्याध्यक्ष अमोल व्यंकट व्हटकर, उपाध्यक्ष भगवान लक्ष्मण शिंदे, खजिनदार शरद शामराव गजाकस, सचिव सुर्यकांत गौतम सोनवणे तर सहसचिवपदी विकास दशरथ कटके यांची निवड करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित कार्यकारणीचे समाजाच्या व मंडळाच्या वतीने अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.