बारामती(वार्ताहर): भगवान वीर गोगादेव जन्मोत्सवाची मिरवणूक रद्द करून मिरवणुकीचा खर्च रू.15 हजार कोरोना निधी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला.
गेली 19 वर्षापासून बारामती शहरात भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोरोना महामारीत सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले हे सर्व पाहता मिरवणूकीचा खर्च कोरोना निधीला देवून भगवान वीर गोगादेव निशाण आखाडाने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
याप्रसंगी नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, गटनेते सचिन सातव, नगरसेवक राजेंद्र बनकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर इ. मान्यवर उपस्थित होते.
यावेळी निशान अखाड्याचे अध्यक्ष ऍड.धीरज लालबीगे, विलासराव लालबिगे, संजय मुलतानी, बा.न.प.आरोग्य निरीक्षक अजय लालबिगे, आनंद लालबिगे, प्रदीप लालबिगे, धर्मेंद्र कागडा, प्रितम लालबिगे, गोपाल वाल्मिकी, राजेश लोहाट, योगेश लालबिगे, राज लालबिगे, सचिन वाल्मिकी, साजन लालबिगे, अतिष लालबिगे, शुभ्रतो झुंज, करण मुलतानी, ऋतुराज लालबिगे, परवेश बागडे, अनिकेत सोलंकी इ. कार्यकर्ते उपस्थित होते. भगवान वीर गोगादेव निशान अखाडा नेहमी सामाजिक कामात सहभाग असतो म्हणून ना.अजित पवार यानी विशेष कौतुक केले.