बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषदेने रूई येथील बयाजीनगरमधील अपूर्ण ड्रेनेज लाईन गेल्या चार वर्षापासून पूर्ण न केल्यामुळे राहुल महादेव सोन्ने, सुदाम नरसिंग कराळे, तानाजी साहेबराव करडुले, दिपक दत्तात्रय कराळे व समस्त बयाजीनगर रूईचे ग्रामस्थांच्या वतीने दि.2 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वा. अमरण उपोषण करण्यात येणार आहे.
बारामती नगरपरिषदेने बयाजीनगर येथील ड्रेनेज लाईन मेन ड्रेनेज लाईनला जोडली नाही. येथील रहिवाश्यांच्या घराभोवती ड्रेनेजचे सांडपाणी साठून राहते त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. वेळोवेळी येथील नागरीकांनी नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचार्यांना फोटोद्वारे व प्रत्यक्षात दाखवून देवूनही अद्यापही या ड्रेनेजचे काम पूर्ण झाले नाही त्यामुळे अमरण उपोषण करणार असल्याचे राहुल सोन्ने यांनी 30 ऑगस्टला नगरपरिषदेला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.