बारामती(वार्ताहर): बँक, फायनान्स् व पतसंस्थांकडून कर्ज वसुलीच्या नाहक त्रासाबाबत बारामतीचे तहसिलदार यांनी नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना दिलेले आहेत.
मानवी हक्क संरक्षण व जागृतीचे बारामती तालुका अध्यक्ष वस्ताद अस्लम शेख यांनी दि.13 ऑगस्टला दिलेल्या लेखी निवेदनावर तहसिलदार यांनी दि.26 ऑगस्ट 2021 रोजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी बारामतीचे उप-कार्यकारी अभियंता यांना फौज/कावि/1246/2021 दि.26/08/2021 रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे.
अस्लम शेख यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सर्वसामान्य नागरीकांमध्ये बँकांची असणारी भिती दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.