गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा चढता आलेख : बारामतीत 78 कोरोना बाधीत

वतन की लकीर (ऑनलाईन): गेल्या काही दिवसांपासून बारामतीत कोरोनाचा चढता आलेख दिसत आहे. बारामतीकरांनी जागृता, सुरक्षिता बाळगणे गरजेचे आहे. निर्बंध शिथिल केल्यावर शहरातील वाढती वर्दळ, परराज्यांतून येणार्‍यांची गर्दी आणि आगामी उत्सव लक्षात घेता करोना प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यासाठी लक्षणे नसली तरी बाधितांच्या संपर्कातील सर्व व्यक्तींच्या तातडीने कोरोना चाचणी करून घेणे गरजेचे आहे.

संपूर्ण देशात रूग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. सक्रीय रूग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. सध्या केरळमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. पाच दिवसात दीड लाख रूग्ण आढळून आलेले आहेत.

बारामतीत दि.28 ऑगस्ट 2021 रोजी दिवसभरात बारामती शहरातून 33 तर ग्रामीण भागातून 45 रुग्ण असे मिळून 78 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.

काल बारामतीत 510 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 32 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकही रुग्ण प्रतिक्षेत नाही. इतर तालुक्यात 13 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

काल खाजगी प्रयोगशाळेत 78 रूग्णांची आरटी-पीसीआर तपासणी केली असता 16 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 1551 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 30 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला आहे. म्युकर मायकॉसिसचे एकुण 40 रूग्णांपैकी बारामती तालुक्यातील 31 तर इतर तालुक्यातील 09 रूग्ण आहेत. यापैकी उपचार घेणारे 04 रूग्ण आहेत.

काल दिवसभरात बारामतीत एकूण 78 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बारामतीत 28 हजार 537 रुग्ण असून, बरे झालेले 27 हजार 462 आहे. आज डिस्चार्ज 62 असुन, आतापर्यंत मृत्यू झालेले 715 असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी कळविले आहे.

संपूर्ण जगभरात 21 कोटी 56 लाख 26 हजार 290 एकुण रूग्ण असुन मृतांची संख्या 44 लाख 93 हजार 941 आहे. प्रति एक दशलक्ष लोकांमागील रूग्ण संख्या 27 हजार 769 आहे.

भारतात 3 कोटी 26 लाख 49 हजार 947 एकुण रूग्ण असुन मृतांची संख्या 4 लाख 37 हजार 370 आहे. प्रति एक दशलक्ष लोकांमागील रूग्ण संख्या 23 हजार 998 आहे. एका दिवसात भारतात 46 हजार 759 रूग्ण सापडतात.

तर महाराष्ट्रात एकुण रूग्ण 64 लाख 47 हजार 442 असुन मृतांची संख्या 1 लाख 36 हजार 900 आहे. प्रति एक दशलक्ष लोकांमागील रूग्ण संख्या 56 हजार 465 आहे. एका दिवसात महाराष्ट्रात 4 हजार 654 रूग्ण सापडतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!