बारामती(वार्ताहर): तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने बारामती तालुका पोलीस स्टेशन, बारामती शहर पोलीस स्टेशन, माळेगाव पोलीस ठाणे इ. ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी महिला आघाडीच्या कल्पना काटकर, सारिका आटोळे, ज्योत्सा सोलनकर, अलका साळुंके, मिनाक्षी जाधव, आशा जगताप, शितल शिंदे इ. महिला उपस्थित राहुन रक्षणकर्त्यांना राख्या बांधल्या. पो.नि.नामदेव शिंदे, पो.नि.ढवाण, सहा.पो.नि. विधाते इ. सह इतर पोलीस कर्मचार्यांना राख्या बांधण्यात आल्या. दिलेली ओवाळणीची रक्कम कोविड सेंटरला देण्यात आली.
याप्रसंगी सौ.काटकर म्हणाल्या की, पोलीस अन्यायाला विरूद्ध लढून त्याला वाचा फोडत असतात. रात्री-अपरात्री कर्तव्य बजावित असतात. तमाम बारामतीकरांचे पोलीस सेवेतून रक्षण करीत असतात.