बारामती(वार्ताहर): प्रभाग क्र.19 मधील नगरसेविका सौ.अनिता जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे सुहासनगर घरकुल योजनेतील नागरीकांची पिण्याच्या पाण्याची टंचाई व होत असलेली गैरसोय दूर झाली.
मध्यंतरी काही सामाजिक संघटनांनी या घरकुल योजनेतील नागरीकांचा पाण्याचा प्रश्र्नाबाबत लक्ष वेधले होते. सदरची बाब स्थानिक नगरसेविका सौ.जगताप यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी पाठपुरावा करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून 24 ऑगस्ट रोजी पिण्याच्या पाण्याचा जोड देवून नागरिकांची होणारी गैरसोय दूर केल्याने येथील नागरीकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.