बारामती(वार्ताहर): आत्मनिर्भर भारत व सामर्थ्यशाली राष्ट्र निर्माण करण्यासाठी स्वहिताबरोबर राष्ट्रहिताला प्राधान्य देण्याची मानसिकता बनविणे अत्यंत गरजेचे असल्याचे भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष ऍड.गोविंद देवकाते यांनी एका पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.
स्वतंत्र भारताचा 75 वा अमृतमहोत्सवी वर्षात पर्दापण होत असताना, पवित्र राज्यघटनेच्या अधीन असणारी जगातील सर्वात मोठी लोकशाही व या लोकशाहीचा कणा म्हणवल्या जाणार्या भारतीय संविधानामध्ये संसद, न्यायपालिका, प्रशासन आणि प्रसारमाध्यमे या प्रमुख चार स्तंभावरील नागरीकांप्रती असणारे उत्तरदायित्व वाढवलेले आहे.
आपल्या आजुबाजूला विध्वंसक शक्तीचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे राष्ट्रहिताच्या व राष्ट्रतेजाच्या अग्निकुंडामध्ये एक नागरीक म्हणून आपण सर्वांनी समर्पित भावनेने, दृढनिश्र्चयाने व आत्मनिर्धाराने सहभागी होण्यासाठी सज्ज झाले पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे.
ऍड.देवकाते यांनी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, संपादक व प्रशासनातील अधिकारी, कर्मचार्यांना भेटून हे पत्र देवून राष्ट्रहिताला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी लिहिलेले….
क्या हारमें, क्या जीत में
किंचित नही भयभीत मैं
कर्तव्य पथ पर जो भी मिला
यह भी सही वो भी सही
वरदान नही मांगूंगा
हो कुछ पर हार नही मानूंगा