बारामती: बारामतीच्या वैभवात भर पडेल अशी एकता इंग्लिश मिडीयम स्कूलची इमारत ज्याठिकाणी उभारणार आहे त्याठिकाणी शिक्षणमहर्षी तथा दि मुस्लीम बँकेचे चेअरमन डॉ.पी.ए.इनामदार यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बँकेचे व्हा.चेअरमन अलीरजा इनामदार, कमरूद्दीन सय्यद, आलताफ सय्यद, परवेज सय्यद, सुबहान कुरेशी, डी.के.सिनकर, श्री.निकम, तबरेज सय्यद इ. मान्यवर उपस्थित होते. इमारतीच्या बांधकामासाठी पी.ए. इनामदार यांनी एक कोटीचा निधी ज्या जागेवर बांधकाम होणार आहे त्याठिकाणच्या परिसराची पाहणी केली.