बारामती(वार्ताहर): राजमाता बहूउदेशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य अंतर्गत रक्तदान हेच जीवनदान या ग्रुपच्या वतीने बारामती येथील सौ.कल्पना काटकर, सोमनाथ कवडे, उमेश दुबे व तैनुर शेख यांना समाजरत्न पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
राजमाता बहूउदेशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य अंतर्गत रक्तदान हेच जीवनदान या ग्रुपच्या वतीने पत्रकारांचा सन्मान व गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राजमाता बहूउदेशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बालाजीभैय्या जाधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमसाठी लातूर जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे आणि लातूर जिल्हा सिव्हिल सर्जन लक्ष्मण देशमुख, रामेश्वर धुमाळ संपादक दैनिक समीक्षा, राजाभाऊ चौगुले जिल्हाप्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष लातूर, बालाजी जाधव संस्थापक अध्यक्ष राजम ता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, विशाल देवकते, संध्याताई जैन आणि संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.