बारामती(वार्ताहर): गेल्या दोन वर्षापासून अदृश्य शत्रूशी दोन हात करून जिवाची पर्वा न करता नागरीकांसाठी सेवा करणार्या डॉक्टर व त्यांचे सहकारी, पोलीस, बा.न.प.चे कर्मचारी इ. राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम आनंदात साजरा केला.
देशाचे भाग्यविधाते खा.शरदचंद्रजी पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार व बारामतीच्या लाडक्या खासदार व राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रणेत्या सौ.सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या सूचनेनुसार पुणे जिल्हा युवती अध्यक्ष पुजा बुट्टे पाटील व बारामती शहर राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या अध्यक्षा आरती गव्हाळे (शेंडगे) यांच्या संकल्पनेतुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, बारामती महिला हॉस्पिटल अधीक्षक डॉ. सदानंद काळे, उपअधीक्षक डॉ.बापू भोई, बा.न.प.आरोग्य विभागाचे निरीक्षक राजेंद्र सोनवणे, मज्जिद पठाण, कैलास काकडे तसेच बारामती शहरात सॅनिटायझर फवारणी, कोरोनाग्रस्त पेशंटवर उपचार करणारे डॉक्टर, वॉर्डबॉय कोरोनामध्ये मृत्यू पावलेल्या लोकांचा अंत्यविधी करणारी टीम, कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी मदत करणार्या रूग्णवाहिकाचे चालक, कोरोना तपासणी करणारे प्रयोगशाळा तज्ञ, कोरोना परस्थितीत चौकाचौकांमध्ये गस्त घालणारे पोलीस कर्मचारी व आरोग्य विभागातील स्वच्छता कर्मचारी या योद्धांना राखी बांधून कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. सदरचा कार्यक्रम रूई येथील महिला रूग्णालयात संपन्न झाला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शहर युवती अध्यक्ष आरती गव्हाळे (शेंडगे), उपाध्यक्षा प्रियांका घोरपडे, संजना गव्हाळे, प्रिया चौरे, पूजा पारख, कविता गव्हाळे, सुप्रिया शेंडगे, पल्लवी पारख, समीक्षा पारख, सुरक्षा वाघमारे, प्रतिक्षा वाघमारे, गायत्री हरिहर, शुभदा खटके, संध्या सोनवणे, राणी सोनवणे, हाफिजा मल्लिक, रोहिणी आटोळे यांनी उपस्थित राहुन कोरोना योद्धांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला.