सामाजिक बांधिलकी जपत समाजकार्य करावे – ना.अजित पवार

बारामती(वार्ताहर): प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपत समाजकार्य करावे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या 62 वा वाढदिवसानिमित्त सहारा फाऊंडेशन बारामतीचे अध्यक्ष परवेज हाजी कमरूद्दीन सय्यद यांच्या वतीने महिला सशक्तीकरण उपक्रमातून 62 गरजू व होतकरू महिलांना शिलाई मशिन वितरण कार्यक्रम प्रसंगी ना.पवार बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण महर्षी तथा दि मुस्लीम को-ऑप बँकेचे चेअरमन डॉ.पी.ए.इनामदार हे उपस्थित होते. नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव, गटनेते सचिन सातव, राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा अध्यक्ष हाजी सोहेल खान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, विभागीय परिवहन अधिकारी रमाकांत गायकवाड, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, बानप बांधकाम सभापती सत्यव्रत काळे, नगरसेवक अमर धुमाळ, नवनाथ बल्लाळ, उद्योजक फखरूद्दीन कायमखानी, नगरसेविका तरन्नुम सय्यद, बारामती बँकेचे व्हा.चेअरमन अविनाश लगड, संचालक शिरीष कुलकर्णी, नगरेसविका सौ.सीमा चिंचकर व बा.न.प शिक्षण मंडळाचे माजी सभापती हाजी कमरूद्दीन सय्यद, मुस्लीम बँकेचे व्हा.चेअरमन अलीरजा इनामदार इ. मान्यवर उपस्थित होते.

पुढे ना.पवार म्हणाले की, मुस्लीम समाजातील मुलं शिक्षणापासून दूर जातात सच्चर कमिटीने जो अहवाल दिलेला आहे त्यानुसार राज्यशासन काम करीत आहे. विविध सामाजिक कार्यक्रम सहारा फौंडेशन राबवित आले आहे. समाजाची गरज पाहुन शैक्षणिक क्षेत्रात सतत मदत करीत आलेलो आहे. वेगवेगळ्या विचारांची लोकं एकत्र करून सरकार केल्यानंतर काही बाबतीत सबुरीने घ्यावे लागते. एकता इंग्लीश मिडीयम शाळेला शालेय शिक्षण मंत्र्यांना सांगून 12वी पर्यंत दर्जावाढ दिला आहे. पी.ए.इनामदार सारख्या दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेतल्यामुळे मदत होत असते.पवार फौंडेशन व विद्या प्रतिष्ठान तर्फे गरजु विद्यार्थ्यांना मदत केली जाते. पवार साहेबांच्यामुळे सकाळी लवकर उठून काम करण्याची सवय लागलेली आहे. पुणे-मोरगाव रोडवर 30 एकर मध्ये आयुर्वेदिक कॉलेज करीत आहोत. मेडद नगरपरिषद हद्दीत आलेले आहे. त्यामुळे मोरगाव रोड जास्तीत जास्त विकसीत करण्याचा प्रयत्न करणार आहे.

एवढ्या सकाळी लवकर माझ्या जीवनातील पहिला कार्यक्रम आहे. 365 दिवस, 12 तासाचा उपयोग कसा केला पाहिजे याचा धडा घेतला पाहिजे. परवेज याने चांगला उपक्रम हाती घेतला असल्याचे पी.ए.इनामदार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परवेज सय्यद यांनी केले. सुत्रसंचालन आलताफ सय्यद यांनी केले तर शेवटी आभार सुबहान कुरेशी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!