अशोक घोडके यांजकडून…
गोतंडी(वार्ताहर): कृषि महाविद्यालय व सामान्य ग्रामीण शेतकरी यांच्यातील दरी कमी करून सुधारीत कृषि तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहचवण्याचे काम कृषि कन्या यशस्वी रित्या करीत आलेले आहेत. याच माध्यमातून गोतंडी गावची कृषिदूत कु.कोमल भारत-शीला नलवडे हिने कृषी विषयक विविध उपक्रम राबविले आहेत.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित, कृषि महाविद्यालय फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि कार्यानुभव कार्यक्रम व औद्योगिक जोड अंतर्गत या विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. गोतंडी येथील नलवडेवस्ती येथे बीजप्रक्रिया, चारा प्रक्रिया, निंबोळी अर्क, विविध चर्चासत्रे, खत व्यवस्थापन, पिकांवरील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन इ. प्रत्यक्षात प्रात्यक्षिके येथे महिला व ग्रामस्थ आणि शेतकरी करून दाखविले.
नलवडेवस्ती येथील शेतकर्यांना कृषि महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ.एस.डी.निंबाळकर, प्रा.एन.एस.धालपे, प्रा.व्ही.पी. गायकवाड, प्रा.एस.वाय.लाळगे, प्रा.ए.एस.नगेर, प्रा.जी.एस.शिंदे, प्रा.एन.ए.यादव, प्रा.एस.एस.आडत यांचे कृषिदूत कु.नलवडे हिचे शेतकर्यांना उत्तम मार्गदर्शन लाभले.
यावेळी भारत नलवडे, सुनील झळके, राजेंद्र सकुंडे, रवींद्र नलवडे, पद्माकर नलवडे, मंगल नलवडे, संगीता नलवडे, वैशाली झळके, कांचन कदम, कल्पना नलवडे हे शेतकरी उपस्थित होते.