वतन की लकीर (ऑनलाईन): सातार्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, फलटण पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या नेतृत्वाखाली खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांनी शिरवळ येथील सुलभ शौचालय चालकाच्या खूनातील एका संशयीतास अटक केली आहे.
रणजित गणपतराव जाधव (वय-40, रा.बौध्द आळी, शिरवळ ता.खंडाळा) या बसस्थानकातील सुलभ शौचालय चालकाचे किरकोळ कारणावरुन गळा आवळून व डोके आपटून खून करण्यात आल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. मात्र, खंडाळा व शिरवळ या दोन्ही पोलीस स्टेशनचे सक्षमपणे जबाबदारी सांभाळणारे बारामतीचे सुपूत्र व बारामती नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा श्रीमती बायडाबाई इंगळे यांचे चिरंजीव महेश किसनराव इंगळे यांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, फलटण पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, वाईच्या शितल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषनचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, आनंदसिंग साबळे, खंडाळा पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांनी तपास करून एका संशयितास ताब्यातही घेतले आहे. अशी माहिती सातारा येथे पत्रकारपरिषदेत बोलताना पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली आहे.