विषाणूची तिसरी लाट प्राणघातक नसेल : बारामतीत 62 कोरोना बाधीत

वतन की लकीर (ऑनलाईन): ऑगस्ट -सप्टेंबर महिन्यात कोरोना विषाणूची तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा यापूर्वी तज्ज्ञांकडून देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी कोरोनाशी लढण्यासाठी तयारी केली आहे.

पण आता कोरोना विषाणूची दुसरी लाट येण्याची शक्यता धुसर झाल्याचं काही तज्ज्ञांनी सांगितलं आहे. ऑक्टोबर महिन्यात कोरोना विषाणूची तिसरी लाट आली तरी, अन्या लाटांप्रमाणे कोरोना विषाणूची तिसरी लाट प्राणघातक नसेल, असंही तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. पण केंद्र सरकारच्या टास्क फोर्सनं यावर टिप्पणी करण्याचं टाळलं आहे. पण काही सदस्यांनी सांगितलं की, तिसरी लाट येण्याची शक्यता खूप कमी आहे. तिसरी लाट आलीच तर ती फार पसरणार नाही.
बारामतीत दि.21 ऑगस्ट 2021 रोजी दिवसभरात बारामती शहरातून 16 तर ग्रामीण भागातून 46 रुग्ण असे मिळून 62 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.

काल बारामतीत 382 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 36 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकही रुग्ण प्रतिक्षेत नाही. इतर तालुक्यात 09 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

काल खाजगी प्रयोगशाळेत 60 रूग्णांची आरटी-पीसीआर तपासणी केली असता 08 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 900 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 18 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला आहे. म्युकर मायकॉसिसचे एकुण 39 रूग्णांपैकी बारामती तालुक्यातील 31 तर इतर तालुक्यातील 08 रूग्ण आहेत. यापैकी उपचार घेणारे 02 रूग्ण आहेत.

काल दिवसभरात बारामतीत एकूण 62 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बारामतीत 28 हजार 078 रुग्ण असून, बरे झालेले 27 हजार 038 आहे. आज डिस्चार्ज 90 असुन, आतापर्यंत मृत्यू झालेले 709 असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी कळविले आहे.

संपूर्ण जगभरात 21 कोटी 13 लाख 04 हजार 126 एकुण रूग्ण असुन मृतांची संख्या 44 लाख 22 हजार 259 आहे. प्रति एक दशलक्ष लोकांमागील रूग्ण संख्या 27 हजार 174 आहे.

भारतात 3 कोटी 23 लाख 93 हजार 286 एकुण रूग्ण असुन मृतांची संख्या 4 लाख 33 हजार 964 आहे. प्रति एक दशलक्ष लोकांमागील रूग्ण संख्या 23 हजार 809 आहे. एका दिवसात भारतात 34 हजार 457 रूग्ण सापडतात.

तर महाराष्ट्रात एकुण रूग्ण 64 लाख 15 हजार 935 असुन मृतांची संख्या 1 लाख 35 हजार 672 आहे. प्रति एक दशलक्ष लोकांमागील रूग्ण संख्या 56 हजार 189 आहे. एका दिवसात महाराष्ट्रात 4 हजार 365 रूग्ण सापडतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!