दानशूर पी.ए.इनामदार यांचेकडून एकता शाळेला 1 कोटीचा निधी

वतन की लकीर (ऑनलाईन): पुण्यानंतर बारामती शैक्षणिक हब म्हणून ओळख होत असताना शैक्षणिक क्षेत्रात व बारामतीच्या नावलौकीकात भर पाडणार्‍या एकता इंग्लिश मिडीयम स्कूलच्या उभारणार्‍या अत्याधुनिक बांधकामाला शिक्षण महर्षी तथा दि मुस्लीम को-ऑप बँकेचे चेअरमन डॉ.पी.ए.इनामदार यांनी दानशूर वृत्ती दाखवीत 1 कोटीचा रूपयांचा निधी दिला.

त्यापैकी 25 लाखाचा पहिला धनादेश राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या हस्ते दि.21 ऑगस्ट 2021 रोजी संस्थेचे अध्यक्ष आलताफ सय्यद, उपाध्यक्ष सुबहान कुरेशी, सचिव परवेज सय्यद यांच्याकडे सुपूर्द केला.

ना.पवार यांनी बोलताना सांगितले की, सदर निधीचा पुरेपूर वापर करून बारामतीच्या वैभवात भर पडेल अशी वास्तु उभी करावी. पी.ए.इनामदार सारख्या दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेतल्यामुळे शैक्षणिक मदत होत आहे. यावेळी तमाम बारामतीकरांच्या वतीने पी.ए.इनामदार यांचे आभार ना.अजित पवार यांनी मानले. सदरचा निधी दिल्याबद्दल शाळा व्यवस्थापनातर्फे ना.अजित पवार यांच्या हस्ते पी.ए.इनामदार यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

पी.ए.इनामदार यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान पाहता त्यांनी उभारलेल्या आझम कॅम्पसमध्ये 5वी-6वी तील गोर-गरीब, होतकरू झोपडपट्टीतील विद्यार्थी मोबाईल दुरूस्ती, टॅब बनवतात विशेषत: या वर्षात या मुलांनी शासनाची एमएससीआयटी कोर्स सुद्धा पूर्ण केलेला आहे. त्यांचे एक ध्येय आहे मुलांना फळा, खडू व डस्टर विरहीत शिक्षण मिळाले पाहिजे. ती वाटचाल सुद्धा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!