महिला सशक्तीकरण उपक्रमातून 62 गरजू व होतकरू महिलांना शिलाई मशीन वितरण

बारामती (वतन की लकीर ऑनलाईन): राज्याचे धडाडीचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या 62 वा वाढदिवसानिमित्त सहारा फाऊंडेशन बारामतीचे अध्यक्ष परवेज हाजी कमरूद्दीन सय्यद यांच्या वतीने महिला सशक्तीकरण उपक्रमातून 62 गरजू व होतकरू महिलांना शिलाई मशिन वितरण करण्यात येणार आहे.

शनिवार दि.21 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 6 वा.45 मि. एकता इंग्लिश मिडीयम स्कूल, मोरगांव रोड, बारामती याठिकाणी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या उपस्थितीत व शुभहस्ते शिलाई मशिनचे वाटप करण्यात येणार असल्याचे मुस्लीम बँकेचे संचालक आलताफ सय्यद यांनी सांगितले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण महर्षी तथा दि मुस्लीम को-ऑप बँकेचे चेअरमन डॉ.पी.ए.इनामदार हे उपस्थित राहणार आहेत. तसेच नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे, आयएसएमटीचे उपाध्यक्ष किशोर भापकर, उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव, गटनेते सचिन सातव, जेष्ठ नगरसेवक किरण गुजर, राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा अध्यक्ष हाजी सोहेल खान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बानप बांधकाम सभापती सत्यव्रत काळे, उद्योजक फखरूद्दीन कायमखानी, नगरसेविका तरन्नुम सय्यद, बारामती बँकेचे संचालक शिरीष कुलकर्णी, नगरेसविका सौ.सीमा चिंचकर व बा.न.प शिक्षण मंडळाचे माजी सभापती हाजी कमरूद्दीन सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

सदर कार्यक्रमास येताना मास्कचा वापर करावा व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येणार असल्याचे सहारा फौंडेशनचे सदस्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!