इस्लामचा नवीन वर्ष मोहरमपासून सुरू होते. त्या नविन वर्षातील मोहरम हा पहिला महिना गणला जातो. इस्लाम धर्माचा मुख्य महिना मोहरम समजला जातो. मोहरच्या 10 तारखेला आशुराचा दिवस साजरा केला जातो. मोहरम करबलाच्या शहीदांच्या स्मरणार्थ (करबला हे मध्य इराकमधील एक शहर आहे), जगभरात सभा आणि मिरवणुका काढल्या जातात. इस्लामचे शेवटचे पैगंबर हजरत मोहम्मद (स.) आणि त्यांचे साथीदार यांचे नातू इमाम हुसेन यांच्या हौतात्म्याच्या स्मरणात मोहरम होतो. जगभरातील मुस्लिम 9 आणि 10 मोहरमच्या दिवशी उपवास करतात आणि मशिदी आणि घरात प्रार्थना करतात.
करबलामध्ये क्रूरकर्मा यजीद राजा मुसलमानांचा खलिफा बनला होता. या राजाने न्यायाची जागा, अन्याय, अत्याचार, शक्ती, सामर्थ्य, प्रदर्शनाने घेतली होती. संयम व विवेकाऐवजी असत्य, दंडेलशाही व नृत्य, संगीत, विलासी भोगवृत्ती या दुर्गुणंानी व्यापली होती. अशा प्रकारच्या राक्षसी राजवटीविरूद्ध हजरत इमाम हुसैन यांना लढाईसाठी राजा यजीदने प्रेरीत केले. या लढाईमध्ये सर्ववर्ण,पंथ, जातीचे 72 सैनिक होते. यजीदच्या बाजुने हजारो सैनिक होते. अशी परिस्थिती असतानाही हजरत इमाम हुसैन अजिबात डगमगले नाहीत त्यांच्या शरीरावर शस्त्राने जखमा झाल्या होत्या. अशा परिस्थितीत हजरत इमाम हुसैन हे नमाज पठण करीत असताना राजा यजीदच्या सेनापतीने त्यांना शहीद केले. हजर इमाम हुसैन यांनी मानवता, सत्य, शांती यासाठी कर्बला येथे बलिदान दिले. परंतु, हुकूमशाह राजा यजीदसमोर गुडघे टेकले नाहीत. कारण जगावर हुकूम त्याचाच चालो, ज्याने जग निर्माण केले. हजरत इमाम हुसैन यांच्या वैशिष्टट्यांमुळेच आज चौदा शतकांनंतरही प्रत्येक वर्षी मोहरमच्या महिन्यामध्ये त्यांचे स्मरण केले जाते.
या महिन्याच्या संदर्भात इतिहासात अनेक वैशिष्ट्ये नोंदवलेली आहेत, परंतु ज्या प्रकारे हजरत इमाम हुसेनने खोट्यापुढे झुकण्यास नकार देत सत्य ठेवले, ते आपल्याला जगण्याचा योग्य मार्ग शिकवते. मोहरम, म्हणजे हराम म्हणजे निषिद्ध. या महिन्याला मोहरम असे नाव देण्याचे कारण म्हणजे या महिन्यात लढणे हराम मानले जाते, म्हणजेच ते निषिद्ध आहे. करबलाची घटना ही जगातील सर्वात मोठ्या घटनांपैकी एक आहे, जी 1400 वर्षे उलटून गेल्यानंतरही अजूनही लक्षात आहे आणि त्याचा प्रभाव किंचीतही कमी झाला नाही. अशा प्रकारे मोहरम हा शोक आणि दुःखाचा महिना आहे.
कत्ल-ए-हुसैन असल में मार-ए-यदीज है
इस्लाम जिंदा होता है हर करबला के बाद
सोया हुआ इस्लाम था हुसैन जगा गए..
नाना की उम्मत को सहादत सीखा गए…
टल ना सकते थे, जो जंग मे अड जाते थे।
पैर शेरो के भी जमीं से उखड जाते थे।
दस्त तो दस्त है, दरीयॉं भी ना छोडा हमने।
बहरे जुल्मात मे दौडा दिया घोडा हमने
जो जवान बेटे की मय्यत पे ना रोया वोह हुसैन।
जीसने अपने खुनसे दुनिया को धोया वो हुसैन।
मरतबा इस्लाम का जिसने दुबाला करदिया।
खुन सेअपने दो आलम में उजाला कर दिया।
कर्बला को कर्बला के शहंशाह पर नाज है,
उस नवासे पर मोहम्मद को नाज है,
यू तो लाखों सिर झुके सजदे में लेकिन,
हुसैन ने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है।
क्या जलवा कर्बला में दिखाया हुसैन ने,
सजदे में जा कर सिर कटाया हुसैन ने,
नेजे पे सिर था और जुबान पे आयते,
कुरान इस तरह सुनाया हुसैन ने।