डीवायएसपी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्तव्यनिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्यामुळे शहरात गुन्हे दाखल होताच उघडकीस

टाईम 24 न्युज महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा संपादक सांगून ऑनलाईन फसवणूक करणारा गजाआड!

बारामतीत बोगस संपादक, पत्रकार, वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी सांगून शासनापासून ते सर्वसामान्यांपर्यंत दबावतंत्राचा वापर करणार्‍यांचा सूळसुळाट! अन्यायग्रस्तांनी न भिता पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी

बारामती(वार्ताहर): येथील शहर पोलीस स्टेशनला ङ्कटाईम 24 न्युज महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा संपादकङ्ख असलेचे सांगुन ओएलएक्स व इतर ऑनलाईन वेबसाईडवर विक्रीसाठी कारचे फोटो टाकुन फसवणूक करणारा एक आरोपी गजाआड तर दुसरा फरार झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी महेश मच्छिंद्र कदम (वय 31 वर्षे, मुळ रा.काटी,ता.तुळजापुर,जि. उस्मानाबाद सध्या रा. देसाईवस्ती बेलवाडी, ता.इंदापुर जि.पुणे) व फरारी आरोपी प्रियांका पांडुरंग जाधव (रा.एम.आय.डी.सी. ता.बारामती, जि.पुणे) या दोघांवर बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. 435/2021 भा.दं.वि.क. 420,34 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

जाधव हिने स्वत:ची मारुती सुझुकी कंपनीची वॅगनार तदख 1.2 मॉडेलची कार नंबर चक-13 ऊङ-7333 ही जङद या ऑनलाईन वेबसाईडवर विक्रीसाठी फोटो व माहीती अपलोड करून यातील फिर्यादी यांना कार आवडल्याने ती खरेदी करण्याचे ठरविले. आरोपी कदम याने फिर्यादीस 13 ऑगस्ट 2021 रोजी बोलाविले. फिर्यादी, त्यांचा भाऊ व मित्र असे तिघेजण बारामती येथे आले. आरोपी कदम याने त्याचेकडील नमुद कारमध्ये बसवुन गाडीची ट्रायल देवून व गाडीचे कागदपत्रे दाखवले नंतर फिर्यादी व आरोपी यांचेमध्ये सदर गाडीचा 5 लाख रुपये रकमेला व्यवहार ठरला त्यातील 4 लाख रु त्याच दिवशी व उरलेली 1 लाख रु रक्कम ही गाडी खरेदीची सर्व प्रोसेस झालेनंतर देण्याचे ठरले त्यांनतर यातील फिर्यादी, साक्षीदार व आरोपी कदम हे सर्वजण स्टेट बँक ऑफ इंडीया भिगवण रोड, शाखा बारामती या ठिकाणी जावुन फिर्यादी व त्यांचे भाऊ यांनी आरोपी कदम याने सांगीतले प्रमाणे आरोपी जाधव यांचे ऍक्सीस बँक शाखा कन्ना चौक सोलापुर मधील खाते क्र.916010068123364 या खात्यावर फिर्यादीचे स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा उंब्रज शाखेतील खाते नंबर 31418204456 मधील दि.13 ऑगस्ट 2021 रोजी आर.टी.जी. एस. व्दारे 4 लाख रुपये ट्रान्सफर केले व त्यानंतर सदर आरोपी कदम याने फिर्यादी व साक्षीदार यांना त्याचेकडील नमुद वाहनात बसवुन घेवुन बारामती येथील नविन प्रशासकीय भवन येथील माऊली झेरॉक्स सेंटर येथे जावून त्या ठिकाणी गाडीचे व्यवहाराची नोटरी करण्यास सुरवात केली थोड्या वेळानंतर आरोपी कदम याने फिर्यादी व साक्षीदार यांना आरोपी जाधव हीस सही करणेकामी घेवुन येतो असे सांगुन त्या ठिकाणाहून चक-13 ऊङ-7333 ही गाडी घेवुन गेला. तो परत लवकर न आल्याने फिर्यादी व साक्षीदार यांनी त्यास त्याचे मोबाईल क्र.9130227333 यावर अनेकवेळा फोन लावले परंतु त्याने फोन उचलले नाहीत. त्यानंतर दुपारी 4:30 याचे सुमारास फिर्यादी व साक्षीदार यांनी ऍक्सिस बँक बारामती येथे जावुन आरोपी जाधव हीचे खातेवर आरोपी कदम याने सांगीतले प्रमाणे आर.टी.जी.एस. केलेल्या 4 लाख रु. रकमेबाबत चौकशी केली असता सदर खात्यावरून सर्व रक्कम विड्रॉल केल्याबाबत सांगितले. त्यानंतरही तक्रार देईपर्यंत फिर्यादी व साक्षीदार आरोपीस फोनव्दारे संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते परंतु आरोपी हा त्यांचा फोन घेत नव्हता तेंव्हा फिर्यादी व साक्षीदार यांची आरोपी कदम व जाधव या दोघांनी संगनमत करून फसवणुक केली असल्याचे लक्षात आले.

सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश निंबाळकर करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गणेश हनुमंत निंबाळकर, सहा.फौजदार शिवाजी निकम, पोलीस नाईक बापु बनकर, पो.कॉ.दशरथ इंगोले, तुषार चव्हाण, अकबर शेख, सायबर क्राईमचे सुनिल कोळी, चैतन पाटील यांनी केली.

बोगस पत्रकारांवर कारवाई कधी होणार?
बारामतीत नेत्यांचे वाढदिवस असल्यावर वृत्तपत्र प्रकाशित करणारे, फक्त जाहिरातदारांना मिळेल एवढेच अंक प्रकाशित करणारे, मनमानेल त्यावेळी वृत्तपत्र प्रकाशित करणारे, बंद पडलेले व अस्तित्वात नसलेल्या प्रेसचा दाखला घेऊन वृत्तपत्र प्रकाशित करणारे, प्रेस रजिस्ट्रारला वर्षाला संपूर्ण वृत्तपत्र प्रकाशित केलेले वार्षिक विवरण दाखवून मोजकेच वृत्तपत्र प्रकाशित करणारे, सोशल मिडीयाच्या नावाखाली शासनाच्या अधिकार्‍यांपासून ते सर्वसामान्य नागरीकांना ब्लॅकमेल करणार्‍या बोगस संपादक, पत्रकार, वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी यांच्यावर कधी कारवाई होणार असा प्रश्र्न सर्वसामान्य नागरीकांना पडलेला आहे. जाहिरातदार, वाचक कधी जागृत होणार? अशा विनापरवाना बोगस वृत्तपत्रांवर प्रेस व पुस्तक रजिस्ट्रेशन अधिनियम 1867 विभाग 4 मधील दंड 15 मध्ये असे म्हटले आहे की, नियमांचे पालन न करता वर्तमानपत्र छापणे किंवा प्रकाशित करणे यासाठी दंड., मुद्रित किंवा प्रकाशित केले असल्यास, दंडाधिकार्‍यासमोर दोन हजार रुपयांपेक्षा जास्त दंड किंवा सहा महिन्यांपेक्षा जास्त कारावास किंवा दोन्ही शिक्षा ठोठावली जाईल.

फसवणूकीबाबत आवाहन….
सदरील आरोपी महेश मच्छिंद्र कदम हा लोकांना गाडी विकताना मी टाईम न्युज महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा संपादक आहे असे सांगुन लोकांचा विश्र्वास संपादन करून लोकाना विश्वासात घेवुन त्यांची फसवणुक करीत आहे. सदर आरोपीवर डोंगरे पोलीस स्टेशन मुंबई गु.र.नं.03/2014 भा.द.वि.क. 365,368,344,346,324,325,506,34 *जेल रोड पोलीस स्टेशन सोलापुर गु.र.नं.331/2018 भा द.वि.क.(बी)(सी), 34 व सोलापुर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं.02/2021 भा.द.वि.क.143,147,148,149, 504,506,380,327 व येक बॉन्सचे दोन गुन्हे दाखल असुन आरोपीने असा प्रकारे कोणाची फसवणुक केलेली असेल तर त्यांनी पोलीस स्टेशनला येवुन तक्रार द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!