बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशन कडून भविष्यात ऑलम्पिकवीर नक्कीच घडेल – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

बारामती(वार्ताहर): बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनची वाटचाल योग्य दिशेने चालली असून, भविष्यात नक्कीच फाऊंडेशन मार्फत ऑलम्पिकवीर नक्कीच घडेल असा विश्वास राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला.

बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या प्रथम वर्धापनदिना निमित्ताने आयोजित समारंभास ते बोलत होते. कोरोनाचा कायम असलेला धोका आणि भविष्यातील विविध महामारी आणि संकटे बघता शारीरिक तंदुरुस्ती अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे इडऋ चा हा उपक्रम नक्कीच पथदर्शक आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सौ.सुनेत्रावहिनी पवार म्हणाल्या, आर्यनमॅन सतिश ननवरे यांची चिकाटी आणि जिद्द यामुळे त्यांनी व्यक्तिगत पातळीवर अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. मात्र सुदृढ आणि सक्षम युवा पिढी घडावी यासाठी त्यांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने सुरू केलेले बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशन हे बारामती मधील आमचे स्वप्न असलेल्या आरोग्य चळवळीचे यश आहे. यावेळी त्यांनी पेडल फॉर ग्लोरइस हिस्ट्री या बीएसएफच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

समाजाच्या तळागाळात फिटनेस चळवळ पोहोचावी यासाठी जुन्या सायकली फाऊंडेशन तर्फे रिन्यू करून मान्यवरांच्या हस्ते त्या गरजू मुलांना प्रदान करण्यात आल्या. यानिमित्ताने बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशन तर्फे कृतज्ञता व बीएसएफ आयकॉन या दोन पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. स्पोर्ट्स क्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या डॉ.आदीनाथ खरात आणि स्विमिंग प्रशिक्षक सुभाष बर्गे यांना कृतज्ञता पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. तर, बीएसएफ आयकॉन पुरस्कार फाऊंडेशनचे 66 वर्षीय सदस्य ललित पटेल आणि अजिंक्य साळी यांना प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीएसएफचे संस्थापक अध्यक्ष आर्यनमॅन सतिश ननवरे यांनी केले. फाऊंडेशने गेल्या वर्षात केलेल्या रिले रन, पेडल फॉर ग्लोरइस हिस्ट्री, कल्पतरू व्याखानमाला आणि बीएसएफची महत्वकांक्षी पहिल्या बारामती आंतरराष्ट्रीय पॉवर मॅरेथॉनची माहिती श्री.ननवरे यांनी दिली.

क्रीडा चळवळीला बळ मिळावे यासाठी या कार्यक्रमात बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनला विविध मान्यवरांनी देणग्या प्रदान केल्या. कार्यक्रमाचे आभार फाऊंडेशनचे सदस्य प्रशांत (नाना) सातव यांनी मानले . याप्रसंगी, बारामती नगरीच्या नगराध्यक्ष सौ.पौर्णिमा तावरे, गटनेते सचिन सातव , प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे आणि बीएसएफचे सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!