बारामती(वार्ताहर): राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांचे वाढदिवसानिमित्त बाळासाहेब चव्हाण पाटील मित्र मंडळातर्फे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
60 लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांना शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. बाळासाहेब चव्हाण पाटील यांनी आत्तापर्यंत 10 हजार 750 लोकांवर उपचार केले आहेत. खंडोबानगर ओम हॉटेल, पाटील कॉर्नर येथे कार्यक्रम करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.