संत निरंकारी मंडळाचे प्रधान पूज्य व्ही.डी. नागपालजी ब्रह्मलीन

अशोक कांबळे यांजकडून
बारामती(वार्ताहर): संत निरंकारी मंडळाचे प्रधान पूज्य व्ही. डी.नागपाल जी यांनी सोमवारी (ता.9) सकाळी 6-30 वाजता आपल्या नश्वर देहाचा त्याग केला आणि निराकार ईश्र्वरामध्ये ते विलीन झाले.

अलीकडेच 24 जुलै रोजी पूज्य नागपालजी यांना संत निरंकारी मंडळाचे प्रधान म्हणून जबाबदारी प्रदान करण्यात आली होती.

श्री विशन दास नागपालजी यांचा जन्म 4 ऑक्टोबर 1931 ला मुजफ्फरनगर (आता पाकिस्तानात) झाला होता.1947 मध्ये देशाची फाळणी झाल्यानंतर ते आपल्या परिवारासह भारतात आले आणि गोहाना, जि.रोहतक येथे स्थायिक झाले. त्यांनी पंजाबमधून इलेक्ट्रिकल इंजीनियर पदवी संपादन केली आणि पी डब्लू डी विभागात लाइन सुपरिटेंडेंट पदावर सरकारी नोकरी केली.

पूज्य नागपालजी यांना मिशनचे तत्कालीन सद्गुरु बाबा अवतारसिंहजी यांच्याकडून 1960 मध्ये ब्रह्मज्ञान प्राप्त झाले. 1966 मध्ये त्यांना सेवादल शिक्षक बनवले गेले तर दिल्ली मध्ये आयोजित 1970 च्या वार्षिक निरंकारी संत समागमात त्यांना ब्रह्मज्ञान प्रदान करण्याची अनुमति दिली गेली 1971 मध्ये ते पंजाबच्या मुक्तसर येथे सेवादल संचालक झाले आणि त्याच ठिकाणी 1972 मध्ये त्यांना सेवादल क्षेत्रीय संचालक म्हणून सेवा प्रदान करण्यात आली.

त्यांची पूर्ण समर्पित भक्ति पाहून सद्गुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी त्यांना मार्च 1987 मध्ये उप मुख्य संचालक (प्रशासन) मुख्यालय या रुपात सेवा सुपूर्द केल्या गेल्या. वर्ष 1997 मध्ये त्यांना भवन निर्माण व देखभाल विभागाचे मेंबर इंचार्ज म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर वर्ष 2009 मध्ये ते संत निरंकारी मंडळाचे महासचिव म्हणून जबाबदारी पार पाडू लागले.

वर्ष 2018 मध्ये सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांनी त्यांना उप प्रधान म्हणून सेवा बहाल केली. त्यांना जी कोणतीही सेवा दिली गेली ती त्यांनी पूर्ण समर्पण भावनेने व तन्मयतेने पार पाडली.

श्री. विशन दास नागपालजी वेळोवेळी सद्गुरुकडून येणारे आदेश जसेच्या तसे पालन करत निष्काम भावाने सेवा निभावण्या साठी सदैव तत्पर राहत असत. त्यांच्या सेवा इतरांसाठी अनुकरणीय व प्रेरणास्रोत बनून राहिल्या असून अनेक पिढ्यापर्यंत त्यांचे स्मरण केले जाईल. सोमवारी सायंकाळी 3-30 वाजता त्यांच्या नश्वर शरीरावर निगम बोध घाट येथील सीएनजी दाहिनीमध्ये अंतिम संस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!