बारामती(वार्ताहर): साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 101 लोकांना जीवनावश्यक किटचे बुधवार दि.18 ऑगस्ट रोजी चंद्रमणीनगर, आमराई बारामती येथे वाटप करण्यात येणार असल्याचे आयोजन चंद्रकांत खंडाळे यांनी कळविले आहे.
दरवर्षी साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रम चंद्रकांत खंडाळे मित्र परिवाराच्या वतीने राबवित असतात. अन्नदान, वृक्षारोपणाबरोबर जीवनावश्यक 101 लोकांना कीटचे वाटप करण्यात येणार आहे. सदरचा कार्यक्रम विविध समाजिक व राजकीय मंडळींच्या उपस्थित संपन्न होणार आहे.