बारामती(वार्ताहर): श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी मांसाहार केला जातो. कारण श्रावण संपला की गणपती महोत्सव असतो त्यामुळे तब्बल दीड महिना मांसाहार करता येत नाही. आषाढी अमावस्येला गटारी अमावस्या म्हटले जाते.
बारामती शहरात शनिवार व रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद केले आहेत. त्यामुळे गटारी अमावस्या व मांसाहार करणार्यांमध्ये प्रश्र्न निर्माण झाला होता. मात्र, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पुणे जिल्ह्याचे सरचिटणीस पार्थ प्रविण गालिंदे यांनी उपविभागीय अधिकारी, बारामती यांना मटण व चिकन मांस पार्सलसाठी परवानगी मिळणेबाबत विनंती केली होती. ती विनंती मान्य करून येणार्या शनिवारी व रविवारी पार्सल सुविधेस परवानगी दिली आहे.
एखाद्या पक्षाच्या व संस्थेच्या पदाचा उपयोग समाजहितासाठी कसा झाला पाहिजे हे पार्थ गालिंदे यांनी केलेल्या अर्जातून दिसत आहे.