महाराष्ट्रातील एकमेव आणि अधिकृत पंतग महोत्सव : पतंग जत्रा म्हणजे कृषी आणि संस्कृतीचा अनोखा मिलाप

पुणे: गेल्या दहा वर्षापासुन पळशीवाडी (ता.बारामती) येथे महाराष्ट्र पर्यटन विभाग आणि बारामती कृषी पर्यटन केंद्र, पळशीवाडी आयोजित पतंग जत्रा कृषी आणि संस्कृती चा अनोखा मिलाप घेण्यात येतो. यंदाचे 11 वे वर्ष असुन कृषी व ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण समाजाचे स्नेहाचे नाते निर्माण करणार्‍या अनोख्या पतंग जत्रेचे आयोजन करण्यात येते, महाराष्ट्रातील हा एकमेव आणि अधिकृत पंतग महोत्सव आहे.

दि.13 ते 16 ऑगस्ट 2021 दरम्यान पतंग जत्रा साजरा केला जाणार आहे. जत्रे साठी 1 दिवस 1 दिवस / 1 रात्र 2 दिवस / 3 रात्र मुक्कामाचे पॅकेज तयार करण्यात आले आहेत, या मध्ये पतंग, दोरा, सह ग्रामीण चवीचे भोजनाचा आस्वाद घेता येणार आहे.

श्रावण महिन्याच्या नागपंचमीला सणाला पतंग उडवणे, हीच खरी तर आपल्या महाराष्ट्राची प्राचीन परंपरा आहे. केवळ आजच्या धावपळीच्या वेळापत्रकामुळे आणि शहरातील जागेच्या कमतरतेमुळे प्रत्येकाला पतंग उडवण्याचा आनंद घेता येत नाही, तसेच ग्रामीण भागात वावडी उडवणे ही प्रता आता विस्मरणात गेली आहे, त्या संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याचा ही प्रयत्न आहे.

पळशी गावातील गजी नृत्य सारख्या विविध लोकनृत्याचे ही पुन्हा लोकांना दर्शन घडवणे आवश्यक आहे, हे सर्व लक्षात घेऊनच या सर्वांचा समावेश असलेली पतंग जत्रा प्रतिवर्षी आयोजित करण्यात येते. विशेष म्हणजे दरवर्षी या जत्रेला प्रतिसाद वाढतो आहे म्हणूच या वर्षी मोठ्या प्रमाणात हा महोत्सव होत आहे.

यावर्षी वावडी बनवण्याची स्पर्धा आयोजित करून विजेत्यांना जागेवरच रोख बक्षिसे दिली जाणार असल्याने हे जत्रेचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

पर्यावरण, संस्कृतीचेच जतन व संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जातो, वड पिंपळ, चिंच, निंब अशा स्थानिक रोप वृक्षारोपण आयोजित केले आहे या मुले परिसरातील वनराई वाढून एकूणच वनरक्षण, जलरक्षण आणि भुरक्षण केले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!