एसपी हॉटेलची बिर्याणी फुकट खाण्याचा अट्टाहासापायी पुण्यातील महिला डीसीपीच्या खुपच अंगलट येण्याची चिन्ह दिसू लागली. मटण बिर्याणी, प्रॉन्स आणि अजून एका नॉन व्हेज भाजीची ऑर्डर द्यायला आपल्या कर्मचार्याला सांगत आहेत. त्यांना हे सगळं एका चांगल्या हॉटेलमधून हवं आहे. हे पदार्थ जास्त तेलकट, तिखटही नको आहेत. त्याचबरोबर त्याची चव चांगली असावी असाही त्यांचा हट्ट आहे. या डीसीपी मॅडम फक्त ऑर्डर देऊन थांबल्या नाहीत. तर त्यांनी आपल्या कर्मचार्याला पोलिसांनी आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे का द्यायचे? असा सवालही केलाय. तो कर्मचारी मात्र यापूर्वी आपण नेहमी पैसे देऊनच खाद्यपदार्थ आणल्याचं सांगतोय. अशावेळी मॅडम महोदय त्या कर्मचार्याला सर्व खाद्यपदार्थ फुकट आणण्यासाठी बजावत असल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.
तर काही पोलीस अधिकारी पोलीस खात्यात विभीषण आहेत. यामध्ये बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांचे नाव घेतले तर वावगे ठरू नये. पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी बारामती शहरचा पदभार स्विकारल्यापासुन त्यांनी न थांबता गुन्हेगारांवर वचक बसविलेली आहे. गुन्हेगाराच्या मनात धडकी निर्माण होईल असे कार्य ते करीत आहेत. विविध वृत्तपत्रातून त्यांना सिंघम म्हणून गौरविले जात आहे.
बारामती शहरात पार्किंगचा मुद्दा ऐरणीवर असताना, त्यांनी पार्किंगचा प्रश्र्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले व करीत आहेत. कित्येक व्यापारी दुकानाबाहेर दुकानाचे फलक रस्त्याच्या कडेला लावत होते. असाच एक प्रकार मारवाड पेठेतील बालाजी मंदिराशेजारील साई फुडस् दुकानाबाबत घडला होता. रस्त्यावरचे बोर्ड पाहताच ग्राहक पार्किंग कुठे करेल असा विचार पोलीस करीत होते. पेट्रोलिंग करीत असताना या दुकानाचा फलक रस्त्यावर पाहता काही पोलीस व होमगार्ड यांनी सदरचा फलक जप्त न करता तो फाडला की जेणेकरून पुन्हा हा दुकानदार रस्त्यावर बोर्ड लावणार नाही. मात्र, दुकान बेसमेंट असल्याने ग्राहकांना दुकान दिसत नव्हते, कोरोनात सर्व धंदे ठप्प झालेले होते. सततच्या लॉकडाऊन व वेळेच्या बंधनामुळे दुकानदार मेटाकुटीस आलेले होते. अशात हे नुकसान झाले. सदरील दुकान मालकाने थेट पोलीस निरीक्षक यांच्या दालनात जावून झालेल्या नुकसानीबाबत व्यथा व्यक्त केली व सांगितले की, साहेब, दंडात्मक कारवाई करा मात्र, अशा लॉकडाऊनमध्ये नुकसान करू नका एवढेच सांगता सदर दुकानदारास पोलीस निरीक्षकांनी न धमकावता त्याची व्यथा ऐकून सर्व पोलीसांना पैसे गोळा करण्याचे आदेश देवून सदरील दुकानदाराचा फलक पुन्हा जैसे थे बनवून द्या असे सांगितले. हे ऐकताच सदर दुकानदाराच्या चेहर्यावर झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याचा आनंद होता मात्र, यापुढे फलक सुद्धा रस्त्यावर लावणार नाही असेही त्याने ठरविले.
वेळोवेळी पोलीस दुकानाबाहेर लावलेला फलक काढण्याची विनंती करीत होते. मात्र दोन पैसे मिळावे म्हणून दुकानदार फलक लावीत होता. यामध्ये दुकानदाराची चुक त्यास कळाली त्यामुळे साहेब देत असलेले पैसे न स्वीकारता यापुढे पोलीसांनी नुकसान न करता दंडात्मक कारवाई करावी व मी यापुढे रस्त्यावर फलक लावणार नाही असे दुकानदाराने सांगितले.
या सर्व प्रकारातून बारामती शहरचे पोलीस निरीक्षक यांनी या दुकानदारास पोलीसांकडून झालेल्या चुकीबद्दल पैसे देण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे डीसीपी मॅडम फुकट बिर्याणी खाण्यासाठी काही नाही त्या संबंधित पोलीस कर्मचार्यास बोलल्या. म्हणून असे पोलीस निरीक्षक हवे असे म्हटले तर वावगे ठरू नये.
या पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या जागी जर दुसरा कोणी अधिकारी असता तर त्याने प्रथमत: खाकी दाखवत संबंधित दुकानदारावर कारवाई केली असती व शासकीय कामात अडथळा केला म्हणून गुन्हा दाखल केला असता. मात्र, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सध्याच्या कोरोना परिस्थितीचा चांगला अभ्यास केलेला आहे. आज जिथं-तिथं हाताला काम नाही, उपासमार चालू आहे धंद्याची अवस्था बिकट आहे या सर्व बाबीचा विचार करून कोणाचे नुकसान झाले नाही पाहिजे हा विचार करून सध्या ते बारामती शहर पोलीस स्टेशनची चोख जबाबदारी पार पाडीत आहेत.