साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त स्नेहभोजनाचा स्तुत्य उपक्रम

बारामती(वार्ताहर): अंग झाडूनी निघ बाहेरी, घे बिनीवरती धाव। धनवंतांनी अखंड पिळवे, धर्मांधांनी तसेच छळले। चा संदेश देणारे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती विधायक उपक्रम राबवित संपन्न झाली.

कै.मारूतीराव शेंडगे मित्रपरिवाराच्या वतीने जळोची येथे स्थायिक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथील नागरीकांना स्नेहभोजन कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे, नगरसेविका अनिता जगताप, बारामती शहराचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष विशाल जाधव, सामाजिक कार्यकर्ते संजय गव्हाळे संजय बगाडे, अरविंद बगाडे उपस्थित होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे जिल्हा उपाध्यक्ष ऍड.सुभाष ढोले यांनी मनोगत व्यक्त करताना मारुतीराव शेंडगे यांच्या कार्याचा उजाळा देत माजी नगरसेविका आरती शेंडगे यांचे व मारुतीराव शेंडगे मित्र परिवाराचे कौतुक केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कै.मारुतीराव शेंडगे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आकाश उर्फ धोनी मांढरे, उपाध्यक्ष अक्षय भैया शिंदे, अक्षय काका थोरात, निलेश भाऊ शेंडगे, राजपाल गायकवाड, रुद्र शिंदे, अक्षय थोरात, नाना मांढरे, अनिकेत हरिहर, रमेश शिंदे, अमर कुचेकर, प्रशांत खुडे, विशाल साळवे, अनिरुद्ध शिंदे, गौरव लोखंडे, सुरज साळवे, अनिकेत शिंदे, मंथन बागव, सागर शिंदे, सचिन जाधव, सागर कुचेकर, धीरज आरडे, रजनीकांत सकट, उमेश शिंदे, हितेश शेंडगे, राहुल कसबे, पिंटू मांढरे, राकेश शेंडगे, करण शेंडगे या कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले. सदर कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!