बारामती(वार्ताहर): मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड बारामती यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक निवास वृद्धाश्रम तांदुळवाडी बारामती या ठिकाणी सदिच्छा भेट दिली.
प्रथम त्यांना खाऊ देण्यात आला. जिजाऊ ब्रिगेड बारामती पदाधिकार्यांनी तेथील निवासी वृद्धांची चौकशी करून त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या. कै. रघुनाथ गेनबा बोरावके चारीटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष राजेंद्र बोरावके यांच्या हस्ते जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकार्यांना सदिच्छा भेटीचे पत्र देण्यात आले. जिजाऊ ब्रिगेड बारामती तालुका अध्यक्षा प्रा.सुषमा जाधव, उपाध्यक्षा प्रा.शारदा मदने, सचिव प्रा.शिलाराणी रंधवे कार्याध्यक्षा प्रा.विद्याराणी चव्हाण यांनी निवासी वृद्धांची चौकशी करून त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या. वृद्धाश्रमाचे पदाधिकारी व सौ.वनिता गुळूमकर यांचे सहकार्य मिळाले. मराठा सेवा संघाचे मा.जिल्हाध्यक्ष दीपक भराटे यांचे मार्गदर्शन लाभले.