बारामती(वार्ताहर): बारामती तालुका नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी पै.सुधाकर माने तर उपाध्यक्षपदी सुदामजी कडणे यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली.
कार्याध्यक्षपदी प्रा.डॉ. सुरेश साळुंखे, खजिनदार गणेश चैधरी, सह सचिव किरण कर्वे यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे समाजाच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.