बारामती(वार्ताहर): दरवर्षी 9 ऑगस्ट क्रांतीदिन संपूर्ण भारत देशात साजरा केला जातो. बारामतीत सुद्धा तशाच पद्धतीने साजरा केला जातो. सोमवार दि.9 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10 वा. वंदेमातरम् चौक, हुतात्मा स्तंभ, भिगवण चौक, बारामती याठिकाणी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन बारामती तालुका स्वातंत्र सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र उत्तराधिकारी संघटनेचे निलेशभई कोठारी यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे. समाजातील प्रत्येक घटकाने यावेळी उपस्थित राहून नविन पिढीला सुसंस्कृत बनविण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे. भारत सरकार तर्फे देशातील स्वातंत्र्य सैनिकांना दिल्ली येथे बोलावून राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात येतो व क्रांतीस्तंभाला अभिवादन करतात.