बारामतीत साठेनगर-कसबा याठिकाणी साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी!

बारामती(वार्ताहर): ही पृथ्वी शेषाच्या मस्ताकावर तरलेली नसून, गोर-गरीब कष्टकर्‍यांच्या तळहातावर तरलेली आहे असा संदेश देणारे विश्र्वविख्यात थोर साहित्यीक साहीत्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती साठेनगर कसबा बारामती याठिकाणी विवीध संघटनांनी एकत्रित येऊन उत्साहात साजरी करण्यात आली.

1 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता बारामती नगरीच्या नगराध्यक्षा सौ.पोर्णिमा तावरे, बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, गटनेते सचिन सातव, राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर यांचे हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक सुरज सातव, नवनाथ बल्लाळ, गणेश सोनवणे, नगरसेविका सौ.मयुरी शिंदे, सौ.तरन्नुम सय्यद, माजी नगरसेविका आरती शेंडगे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सतिश फाळके, मा.नगरसेवक आप्पा अहीवळे, ऍड.गुलाबराव गावडे, ऍड पी.टी.गांधी,ऍड.विनोद जावळे, ऍड.भार्गव पाटसकर, सामाजिक कार्यकर्ते श्रीपाद कुलकर्णी, बबन लोंढे, टी.व्ही.मोरे, संतोष आगवणे, शरद सोनवणे, श्याम जाधव, चंद्रकांत खंडाळे, घेरे सर, पत्रकार अमोल यादव, निलेश जाधव, साधु बल्लाळ, बापु शेंडगे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी व कसबा विभागातील बहुजन समाज बांधव उपस्थित होते.

सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष विजयराव खरात, ऍड.सोमनाथ पाटोळे, ऍड.अमृत नेटके, ऍड.स्वप्निल खरात, सागर जाधव, अहमद तांबोळी, विश्वास लांडगे, राजेंद्र खरात, संतोष खरात, विजय नेटके, केदार पाटोळे, संजय भोसले, विक्रम लांडगे, अमर कांबळे, विजय सकट,राहुल खरात,विक्रम पाटोळे, किरण कसबे, अजय खरात, संजय रणदिवे, अमोल इंगळे, सनी खरात, अतुल गायकवाड, आकाश पाटोळे, हर्षद खरात व साठेनगर मधील विवीध संघटनांनी एकत्रित येऊन परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!