मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडतर्फे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांचा सत्कार

बारामती(वार्ताहर): येथील मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड बारामती यांच्या वतीने बारामती पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

बारामती मधील खाजगी सावकारी विरोधात कडक पावले उचलीत साहेबांनी गोरगरीब पिडीतांची सुटका केली व या प्रथेचे उच्चाटण केले आहे. गुन्हेगारांच्या मनात धडकी भरेल अशी कडक पावले उचलली आहेत. अवैध धंदे बंद करून काही अवैध धंदेवाल्यांचे पुर्नवसन देखील केले आहे. या सर्व बाबींचा विचार करीत त्यांचा पोलीस स्टेशन मध्ये जावून मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड बारामती च्या पदाधिकारी यांनी सत्कार केला.

यावेळी मराठा सेवा संघाचे माजी पुणे जिल्हाध्यक्ष शिवश्री दिपक भराटे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री प्रशांत तावरे, शहराध्यक्ष शिवश्री विकास खोत, पोलीस मित्र सुरज तावरे, जिजाऊ ब्रिगेड बारामतीच्या अध्यक्षा शिवमती सुषमा जाधव, उपाध्यक्षा शारदा मदने, सचिव शिलाराणी रंधवे, कार्याध्यक्षा विद्याराणी चव्हाण तसेच प्रितम गुळुमकर, संचित मदने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!