भिगवण(वार्ताहर): भारतीय बैठकीचे महालक्ष्मी स्पे.मटन खानावळ या नवीन हॉटेलचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष करण इंगुले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पराग जाधव, विजय इंगुले, दुर्योधन इंगुले, गणेश खडके, महेश घोडके, सुरज थोरपे, साहिल ताडे इ. मान्यवर उपस्थित होते.
पुणे सोलापूर हायवे वरील डायमंड जिम बिल्डींग भिगवण याठिकाणी सदर हॉटेल सुरू करण्यात आले आहे. सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत व आभार अशोक कांबळे, अमर कांबळे व आनंद कांबळे यांनी मानले. कांबळे बंधूंनी सुरू केलेल्या नव्या व्यवसायासाठी करण इंगुले व उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.