बारामती(वार्ताहर)ः राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त कोविड काळात जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स, कर्मचारी वृंद यांनी जी रूग्णांची सेवा केली त्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने विविध कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला.
26 जुलै रोजी सायं. 5 वा. बारामती येथील डॉ.शशांक जळक, डॉ.गणेश बोके, डॉ.सुरज धुरगुडे, डॉ.अश्वीनकुमार वाघमोडे, डॉ.दादासाहेब पोंदकुले, डॉ.कपील सोनवणे, डॉ.नितीन काळे, डॉ.संदीप बनकर, डॉ.संजय बेंद्रे, डॉ.संजय मोकाशी, संदीप मोकाशी तसेच श्री. चैतन्य हास्पिटल व शिवनंदन हॉस्पीटलचे निवासी डॉक्टर, नर्स, कर्मचारी वृंद यांचा शाल,श्रीफळ व सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, सरचिटणीस डॉ.अविनाश गायकवाड, महिला शहराध्यक्षा सौ.अनिता गायकवाड, ऍड.विजयसिंह मोरे, टि.व्ही. मोरे, शब्बीर शेख, बाबा सावंत, सौ.ज्योती जाधव, सौ.शोभा मांडके, सौ.रोहीणी जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड.अविनाश गायकवाड यांनी केले. इम्तियाज शिकीलकर यांनी या सन्मानाची पार्श्वभूमी सांगून करोनामुक्त बारामतीचे दिशेने चालू असलेल्या प्रयत्नाबद्दल सर्वांचे कौतुक केले. डॉ. शशांक जळक यांनी अशीच सेवा यापुढील काळातही चालू ठेवणार असल्याचे सांगून अजितदादांना सर्वांचे वतीने वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा दिल्या. आभार डॉ.नितीन काळे यांनी मानले.