बारामती(वार्ताहर): योग्य उपचार केल्यास तोंडाचा कर्करोग बरा होतो असे प्रतिपादन ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्र्वस्त सौ.सुनंदाताई पवार यांनी केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुका राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस व बारामती शहर युवती कॉंग्रेसच्या वतीने तोंडाच्या कर्करोग तपासणी व स्क्रिनींग शिबीराचे उद्घाटन प्रसंगी सौ.पवार बोलत होत्या.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे, बारामती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ.चंद्रकांत म्हस्के, सिल्व्हर ज्युबिलीचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे, महिला रूग्णालयाचे वैद्यकीय उपअधिक्षक डॉ.बापू भोई इ. मान्यवर उपस्थित होते.

पुढे सौ.पवार म्हणाल्या की, पुरुषांमध्ये असणारे तंबाखू व गुटख्याचे व्यसन प्रामुख्याने तोंडाच्या कर्करोगास कारण ठरते. योग्य उपचार केल्यास जीव वाचतात व त्यामुळे आयुष्य संसार उद्धवस्त होण्यापासून वाचते. आरोग्याचे दृष्टीने अतिशय महत्वाचे असलेल्या या रोगाच्या निदानासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सदरचे शिबीर बारामती महिला ग्रामीण रूग्णालयात दि.22 ते 24 जुलै 2021 पर्यंत सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आले होते. या शिबीराचे आयोजन राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस बारामती तालुका अध्यक्षा सौ.वनिता बनकर व बारामती शहर राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या सौ.आरती गव्हाळे यांनी केले होते.